Wednesday 30 November 2011

HYBRID TREKKERS TREK TO PRABALGAD


The wait is finally over and its time now to get back into the nature and to get back to what we call Trekking habit”.

Ø  Date:                    25 TH December 2011.
Ø  Difficulty level:                Moderate.
Ø  Cost:                      Rs.400/- per head
*Registration fees once paid are not refundable under any circumstances*

Cost includes: - Travelling charges by private bus, tea, breakfast and lunch (simple vegetarian meal) and  
                                trekking fees.

Everyone should reach Ruia College (Matunga-east) premises by 6.30 a.m. (SHARP.)
Reach back to college around 7.00 p.m.

Things to carry:
1) A pair of dry clothes. (If required).
2) A pair of shoes. COMPULSORY.
3) A bottle of water 1 Litre Min, snacks and plastic bags.
4) Personal medicines if any.
5) Glucon D, painkiller, crocin, band aids. (If required).

v  Camera and mobile phones or any other personal belongings should be brought at your own risks and taken care of.
v  Please inform the coordinators prior about any specific health problems or any allergic reactions.

Note :
·         It should be noted that the trek organized is purely a private affair .
·         Participation will be confirmed only by phone.
·         So people hurry up & register yourselves asap. The last date to pay the money is 18th December 2011.


Ø  For Any Querry Contact :
Kaustubh Padwal   : 9930251468                  Viraj Tavsalkar          : 9167473787
Suyog Lohar           : 9664365804                  Omkar Juvekar         : 9969723706
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday 11 November 2011

From 'आईशप्पथ' to 'ए धावा रे'


         जरा विचित्र वाटतय ना शीर्षक वाचून. पण ट्रेकला गेल्यावर एकाच वेळी या दोन्ही भावना कानांवर पडल्या नाही  असा ट्रेकच होत नाही.एखादा नवखा ट्रेकर असेल तर ट्रेक करताना सतत त्याच्या मनात  हेच शब्द येतात " आई शप्पथ! हा काय tough patch  आहे. मी कसा चढणार?"." आई शप्पथ ! इकडून उतरताना तर माझी वाटच लागणार ." त्याच्या चेहऱ्यावरच्या घामावरून आणि मनात असण्याऱ्या tension वरून आपण आरामात ओळखू शकतो , हा ह्याचा पहिलाच ट्रेक असणार. या उलट एखादा ट्रेकर ज्याने किमान - ट्रेक केलेले असतात ट्रेकींग या कलेशी जो थोडाफार सुसंगत असतो , तो तर सगळ्यांना पळायलाच सांगत असतो.त्याचा attitude थोडा बिनधसच असतो. त्याला आपल्याबरोबर हळू चालणारी मंडळी तर bore वाटतात .अश्या  या दोन विरोदाभास असणाऱ्या भावना, पण प्रत्येक ट्रेकला सापडतातच.

       मजेशीर म्हणजे मी ह्या दोन्ही category मधेल्या व्यक्तिरेखा अनुभवल्या आहेत. एखाद्या नवख्या ट्रेकरच्या भावना, त्याला असलेलं दडपण, tension हे तर मला माझ्या पहिल्या ट्रेक मध्ये कळलच पण आता जेव्हा आम्ही लोकांना ट्रेकिंगसाठी घेऊन जातो तेव्हा मला ही दुसरी बाजू देखील हळू हळू उमजायला लागली आहे. माझा तसा ट्रेकिंग चा अनुभव काही जास्त नसून चार वर्षांचाच आहे,  तरीही नवखा घाबरूट ट्रेकर ते 'Organiser ऑफ HYBRID TREKKER ' चा प्रवास कसा पटकन घडला हे  माझं मलाच कळलं नाही.

      माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक हा राजगड-तोरणा. आता मागे वळून वाटतं आपली ट्रेकिंग ची गाडी direct तिसऱ्याच gear  मध्ये सुरु झाली. पण बरंच झालं ना एकदा कठीण विषयाचा पेपर सोडवला की बाकीचे पेपर हे बऱ्यापैकी सोपेच वाटतात. ट्रेकिंग च्या आठवणीतील तो ट्रेक अविस्मर्णीयच राहणार, आयुष्यभर. तो गारठा, ते धुकं ती हिरवळ आणि सतत ती मनातली धडधड .ते क्षण विसरणं अशक्यच. Especially , राजगड ते तोरणा चा प्रवास. पायाच्या नुसत्या काड्या झाल्या होत्या आणि पोटात कावळ्यांचा ओरडून ओरडून घसा बसलेला. माझ्या आठवणी प्रमाणे मी अर्धा ट्रेक तर बसूनच केलेला आणि सतत मदतीसाठी हाथ मागून मित्रांना भंडावून सोडलं होतं.

       पण आता मागे वळून पाहिलं तर वाटतं बरच पाणी पुलाखालून गेलय. त्या काळी घाबरत उतरलेले patches आज सराईत धावत पार करताना काहीच वाटत नाही. ह्याचं कारण कदाचित  HYBRID असावं. ४०-५० लोकांना एकत्र ट्रेकसाठी घेऊन जाणं, त्यांची ख्याली खुशाली बघणं त्यांना सुखरूप परत आणणं. ह्याची जबाबदारी, त्याचं ते tension , हे त्या tough patches च्या तुलनेत खूपच challenging वाटतं.पण समाधानाची गोष्ट अशी की The journey is going on smoothly.

       पार "अभी दिल्ली बहुत दूर हैं |"," ये तो सिर्फ शुरुवात हैं |". बघायला गेलं तर ही सुरुवातच आहे. या वर्षी १५ ऑगस्ट ला HYBRID  ला एक वर्ष पूर्ण झाली आणि हा खास दिवस आम्ही परत राजगडावर साजरी केला. आत्ता कुठे आम्हाला पंख फुटले आहेत, अजून आकाशात उंच झेप घ्यायची बाकी आहे.Indeed Sky is the limit for us.
 



ओंकार दिनेश जुवेकर
HYBRID TREKKERS